२०२३ वर्षाच्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट- CUET चा निकाल जाहीर

 

नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं २०२३ वर्षाच्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट- सीयुइटीचा निकाल आज जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार cuet.samarth.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं २१ मे ते ५ जुलै या कालावधीत ही परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी एका ट्विटमध्ये दिली आहे.