डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेसंदर्भातल्या मुद्याबाबतचा कायदेशीर भाग उपमुख्यमंत्री सभागृहासमोर मांडणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अपात्रतेसंदर्भातल्या मुद्यावर सभागृहात चर्चा करण्याची पद्धत नाही तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बाबत कायदेशीर भाग सभागृहासमोर मांडतील असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं.

विधानपरिषदेत आज कामकाज सुरू होताच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला मात्र उपसभापतींच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर चर्चा होऊ द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा मांडावा, यावेळी तालिका सभापती सभागृहाचं कामकाज सांभाळतील, असं पाटील यांनी सांगितलं .

आज सकाळी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत तोडगा निघालेला आहे त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा मांडावा असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही सांगितलं. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरळीत सुरू झाला.

राज्यात शिक्षक भरती लवकरच केली जाईल या शिक्षक भरती प्रक्रियेवर न्यायालयाने स्थगिती आणली होती आता ती उठली आहे. या कारणाने चालू वर्ष काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात निवृत्त शिक्षक घेण्यात आले होते पण आता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानभवनात दिली. 

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image