द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना


 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महामार्ग ओलांडणाऱ्या जनावरांना अटकाव घालण्यासाठी आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी थांबवण्यासाठी देशातल्या सर्व द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. सर्वसमावेशक उपाय म्हणून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० च्या विभाग २३ वर  हे कुंपण बसवलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

हे कुंपण आग प्रतिबंधक दर्जाचं असून, देशातले सर्व महामार्ग शाश्वत करण्याच्या आणि वन्य जीव आणि पशुधनाला  पोहोचणारी हानी रोखण्याच्या आत्मनिर्भर भारताच्या तत्त्वांशी सुसंगत असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.