चांद्रयान-३ साठीची उलट गणना सुरू होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताचं तिसरं अभियान चांद्रयान-३ साठीची उलट गणना आज सुरू झाली. २६ तासांची ही उलट गणना दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झाली. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण केलं जात आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्त्रो एलव्हीएम-३ या यानाद्वारे उद्या दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-३ चं प्रक्षेपण करेल. या मोहिमेद्वारे भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं अंतराळ यान सुरक्षित आणि सुरळीतपणे उतरवणारा चौथा देश ठरणार आहे.