मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून १ वर्षांत १० हजार ५०० पेक्षा जास्त गोरगरीब -गरजू रुग्णांना आर्थिक मदत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं अवघ्या १ वर्षांत १० हजार ५०० पेक्षा जास्त गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण ८६ कोटी ४९ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. त्यानंतर सातत्यानं हा आलेख वाढत गेला. गेल्या महिन्यात ९४२ रुग्णांना १४ कोटी ८१ लाख, रुपयांची विक्रमी वैद्यकीय मदत देण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील केला असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी,  कर्करोगावरील शस्त्रक्रिया , केमोथेरपी,  डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात , भाजलेले रुग्ण , जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.