‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या धर्तीवर ‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता मिळाली असून, त्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. त्यानुसार मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शिधारथ या फिरत्या शिधावाटप दुकानांमार्फत धान्यांचं वितरण केलं जाणार आहे. ही योजना तीन टप्प्यात राबवली जाईल. शिधा वाटप दुकानाच्या प्राधिकार पत्र मंजुरीचे अधिकार शिधा वाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा विभागाच्या संचालकांना दिले आहेत. 

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image