संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने राज्यसभेतल्या सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली आहे.  राज्यसभेत विधायक कामकाज व्हावं यादृष्टीने उपराष्ट्रपती सर्व सदस्यांना आवाहन करतील. पुढच्या गुरुवारी सुरू होत असलेल्या या अधिवेशनात १७ बैठका होणार असून ते ११ ऑगस्टपर्यंत चालेल.