राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मोदी आडनावावरुन जाहीर सभेत केलेल्या टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका आज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना ठोठावलेली २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा कायम राहिली असून पुठची आठ वर्ष ते खासदारकीसाठी अपात्र राहतील. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी “सर्व चोरांचे आडनाव मोदा का असते..?” अशा प्रकारची आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावर गुजरातमधले भाजपानेते  पूर्णेश मोदी यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. सुरत न्यायलयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून २३ मार्च २०२३ रोजी २ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्याला गांधी यांनी सुरतच्या  सत्र न्यायालयात आव्हान दिलं होत.  न्यायालयाने ते  फेटाळलं. त्याविरुद्ध गुजरात उच्च न्यायालयात राहुल गांधी यांनी दाद मागितली होती.