इस्राईलचे प्रधानमंत्री बेन्जामिन नेतान्याहू यांच्या हृदयावर शस्त्रकिया

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इस्राईलचे प्रधानमंत्री बेन्जामिन नेतान्याहू यांच्या हृदयावर काल तातडीने शस्त्रकिया करण्यात आली. रुग्णालयाच्या सूत्रांनुसार त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. न्यायव्यवस्थेत काही महत्वाचे फेरबदल करण्याबाबत तेथील संसदेत महत्वपूर्ण मतदान होणार होते, परंतु त्यापूर्वीच त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं.

इस्राईलमधील कामगार संघटनांचा  या सुधारणांना  विरोध असून, हे विधेयक पारित झाल्यास, संपावर जाण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. पुढील 48 तासांत या विधेयकावर मतदान होण्याची शक्यता आहे. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर मर्यादा आणणाऱ्या या सुधारणा विधेयकाच्या विरोधात इस्राईलमध्ये गेले अनेक महिने निदर्शने सुरु आहेत.