१६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी न्यायालयाने दिला आहे.

आमदार अपात्रततेबाबत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर जलद सुनावणी करण्यासाठी अध्यक्षांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.  त्या  याचिकेवर आज झालेल्या सुनावणीनंतर, ही नोटीस बजावली असून जबाबात १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी काय कारवाई केली याचा तपशील द्यायला न्यायालयाने सांगितलं आहे.