मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी राहुल गांधी यांच्या याचिकेवर २१ जुलै रोजी सुनावणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या २१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राहुल गांधींच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी अशी मागणी आज केली. न्यायालयाने 21 जुलै रोजी सुनावणीचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ते सध्या जामिनावर आहेत, मात्र दोषी ठरल्यामुळे त्यांची  खासदारकी रद्द झाली आहे. सुरतच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात गांधी यांनी सुरत सत्र न्यायालयात आणि गुजरात उच्च न्यायलयात यापूर्वी अपील केल होतं मात्र ते फेटाळण्यात आलं.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
मुंबईतील किल्ल्यांच्या विकास शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबविण्याचे नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image