मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. भारतीय संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत असलेल्या बिर्ला यांनी उलान बातोर इथं राष्ट्रपती उखनागीन खुरेलसुख यांची भेट घेतली , त्यावेळी ते बोलत होते.
बौद्ध धर्माचा सामायिक वैभवशाली वारसा दोन्ही देशांमधल्या संबंधांना अधोरेखित करतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगोलियाच्या राज्य भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले असून, मंगोलियाच्या आर्थिक विकासात भारत हा विश्वासार्ह भागीदार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.