अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्याची जबाबदारी आता दहशतवाद विरोधी पथकाकडे - उपमुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्याची जबाबदारी राज्य सरकारने दहशतवाद विरोधी पथकाला दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी याविषयावर मांडलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. जिल्हा पातळीवर अमली पदार्थ विरोधी समन्वय समिती स्थापन केली असून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुख यावर दरमहा बैठक घेतात असे ते म्हणाले.

विविध बंदरांमधून हे साहित्य देशात येऊ नये यासाठी सर्व बंदरांवर विशेष स्कॅनर लावले आहेत. सर्व कंटेनर या scanner मधून जातात, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय पोस्ट office आणि courier ऑफिस मध्ये जनजागृती केली आहे. NDPS कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ९० ऐवजी १८० दिवस करावी अशी सूचना केली आहे. यामुळे या व्यवहारामागच्या सूत्रधारांना पकडले जाईल असे त्यांनी सांगितले. याशिवाय व्यावसायिक उपयोगासाठी अमली पदार्थ बाळगण्याची मर्यादा कमी करण्याची शिफारस केंद्र सरकारला केल्याचे ते म्हणाले.

मुंबईतल्या सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयाचे fire audit येत्या ३ महिन्यात पूर्ण केले जाईल, असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिले. यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले.