पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले असले तरी अद्याप दमदार  पाऊस न झाल्यानं अकोला जिल्ह्यातले शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी २०१ पूर्णांक ७ दशांश मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना केवळ ७३ पूर्णांक ९ दशांश मिलिमीटरच  पाऊस झाला असल्यानं शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. दररोज आकाशात दाटणारे ढग हुलकावणी देत पुढे निघून जात असल्यानं शेतकरी वर्गाची  चिंता वाढली आहे. पावसाच्या अभावामुळं पेरणीला  विलंब झाला असून कृषी महासंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात केवळ ४६ हेक्टर क्षेत्रावरच  पेरणी करण्यात आली आहे.

Popular posts
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image