शासकीय अधिकाऱ्यांचे वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचे परीक्षण होणं आवश्यक - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शासकीय अधिकाऱ्यांचे चुकीचे निर्णय लोकांना त्रासदायक  होत असल्याने वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचे परीक्षण सुद्धा होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं केलं. ते नागपूर इथं आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात आज बोलत होते. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये लालफितीच्या जाळ्यात अडकलेल्या पदभरतीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विभागांनी युद्ध स्तरावर पूर्ण करण्याचे ठरवले असून या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आता युवकांना शासकीय नोकऱ्या मिळत आहेत, असे गडकरींनी स्पष्ट केले. जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून तुम्ही शासकीय सेवेत लोकांची सेवा करा नियमांचे पालन करा. गुणवत्तापूर्ण कामगिरीकडे लक्ष द्या, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.