कर्ज परतफेडीसंदर्भात सरकारने सर्व बँकांना संवेदनशीलता आणि मानववादी दृष्टिकोनातून प्रश्न हाताळण्याचे निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, कर्ज परतफेडी संदर्भात सरकारने सर्व बँकांना संवेदनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून प्रश्न हाताळण्याचे निर्देश दिले आहेत. आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या की, काही खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका कर्जाच्या परतफेडीच्या बाबतीत कर्जदारांशी निर्दयीपणे वागत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्या पुढे म्हणाली की, अशा प्रकरणांना मानवतावादी पद्धतीने हाताळण्यासाठी आरबीआयशी सल्लामसलत करून योग्य त्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.