भारत २०७५ पर्यंत जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा गोल्डमन सॅक्स गुंतवणूक बँकेचा अंदाज

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत २०७५ पर्यंत जपान, जर्मनी आणि अमेरिकेच्या पुढे जाऊन जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज गोल्डमन सॅक्स या जागतिक स्तरावरील गुंतवणूक बँकेनं वर्तवला आहे. भारताचा जीडीपी ५२ लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून, तो अमेरिकेपेक्षा अधिक असेल, असं गोल्डमन सॅक्सनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. सर्वाधिक लोकसंख्या, नवकल्पना आणि तंत्रज्ञानातील  प्रगती, उच्च भांडवली गुंतवणूक आणि वाढती उत्पादकता यामुळं भारताची वेगवान वाढ होईल. राजकीय स्थिरता, अनुकूल लोकसंख्या, व्यवसायअनुकूल वातावरण यामुळे जगभरातील गुंतवणूकदार भारताकडं आकर्षित होत आहेत. २१ लाख कोटी डॉलरच्या मालमत्तेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ८५ सार्वभौम निधी संस्था आणि ५७ मध्यवर्ती बँकांनुसार, भारत गुंतवणुकीसाठी प्रथम क्रमांकाची उदयोन्मुख बाजारपेठ असून, याबाबतीत भारतानं चीनलाही मागं टाकलं आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे.