प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बदलत्या भारतात टपाल खात्याची कात टाकायला सुरुवात


 

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बदलत असून या बदलत्या भारतात आता टपाल खात्यानेदेखील कात टाकायला सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन खासदार प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात केलं. टपाल खात्यातर्फे यशदा इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जावडेकर यांच्या हस्ते, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र विशेष मोहीम आणि महादेव कोळी जमाती अशा दोन विशेष पाकिटांचं अनावरण कऱण्यात आलं. महिला सन्मान बचत पत्र मोहिमेत विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.