राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या काल करण्यात आल्या. यामध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची मुंबईत महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभाग सचिवपदावरून कृषी आणि पशूसंवर्धन विभागाचे सचिव  म्हणून बदली करण्यात आली आहे.

संजय चव्हाण यांची अतिरिक्त कंट्रोलर ऑफ स्टॅम्प कार्यालयात तर गंगाथरण डी. यांची मुंबई महापालिकेच्या सहआय़ुक्तपदी बदली करण्यात आली आहे. संजय खंदारे यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर मकरंद देशमुख यांची मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.