आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना अटक

 

मुंबई : कर्ज वाटप प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी औरंगाबाद इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना पोलिसांनी अटक केली.

अपहार प्रकरणात १० जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर मानकापे फरार होते. काल त्यांना औरंगाबाद जिल्ह्यात गोलवाडी भागातल्या एका लॉजमधून ताब्यात घेण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.