संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळात प्रतिनियुक्तीने पदे भरण्यात येणार

 

मुंबई : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या आस्थापनेवर अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार असल्याची  माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

या महामंडळाच्या आस्थापनेवरील पुढील पदे सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १७ डिसेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पद व पदाची एकूण संख्या पुढीलप्रमाणे आहे, व्यवस्थापक एकूण पदे १ (वेतनश्रेणी एस २३), सहव्यवस्थापक एकूण पदे ३ (वेतनश्रेणी एस १६), उपव्यवस्थापक एकूण पदे ७ (वेतनश्रेणी एस १४), उच्च लघुलेखक एकूण पदे १ (वेतनश्रेणी एस १३), सहायक व्यवस्थापक एकूण पदे ५ (वेतनश्रेणी एस १०), सहाय्यक एकूण पदे ७ (वेतनश्रेणी एस ८), जिल्हा व्यवस्थापक एकूण पदे ३० (वेतनश्रेणी एस १५), लेखापाल एकूण पदे ३२ (वेतनश्रेणी एस ८), वसुली निरीक्षक एकूण पदे २३ (वेतनश्रेणी एस ८)  या वेतनश्रेणीतील पदे भरण्यात येणार आहेत.

ही पदे प्रथम एक वर्ष कालावधीकरिता व नंतर कालावधी वाढविण्याच्या अटीवर प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी शासनाच्या विविध विभागात या पदाच्या व वेतनश्रेणीच्या समकक्ष पदावर व वेतनश्रेणीवर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी दि. १५ जुलै ते दि. ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत अर्ज  व्यवस्थापकीय संचालक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई येथे करावेत, याबाबतची सविस्तर माहिती महामंडळाच्या  www.lidcom.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच मंत्रालयीन इंन्ट्रानेट या संकेतस्थळावर प्रतिनियुक्त्या (Deputation) या लिंकखाली सविस्तर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

याबाबतच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत, विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

ही जाहिरात किंवा त्याद्वारे झालेली निवड प्रक्रिया कोणत्याही टप्यावर कोणतेही कारण न देता रदद करण्याचे अधिकार महामंडळाकडे राहतील. यासाठी अधिकारी / कर्मचारी कार्यरत असणाऱ्या विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.