संपूर्ण बॅकींग प्रणालीत फिनटेक क्रांतीच्या माध्यमातून आमूलाग्र बदल - आरबीआयचेचे डेप्युटी गर्व्हनर टी रवीशंकर
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी काल सांगितलं की, संपूर्ण बँकिंग प्रणाली फिनटेक क्रांतीतून जात आहे. आणि यामुळे बँकिंग क्षेत्रातील प्रक्रिया आणि वितरण प्रणालीत सकारात्मक बदल घडून येत आहे. ते इंडियन बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात "इंडियाज सीबीडीसी जर्नी - रिफ्लेक्शन अँड द वे फॉरवर्ड" या विषयावर बँकर्सना संबोधित करताना बोलत होते. ते म्हणाले की UPIअर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस आणि CBDC अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सी या दोन्ही वितरण प्रणालीत ट्रान्स्फर इन्स्ट्रुमेंट हा फार जुना फरक असून यामध्ये चलनाचा समावेश नंतर करण्यात आला आहे. ते म्हणाले की सीबीडीसीला चालना देण्यासाठी यूपीआय नेटवर्कचा वापर केला जाईल. CBDC चलनाच्या भौतिक स्वरूपाच्या छपाईवर होणारा मोठा खर्च यामुळे कमी होईल, असंही त्यांनी सांगितलं. रवि शंकर म्हणाले की, सीबीडीसी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.