९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिकेच्या वैधतेबाबत प्रफुल्ल पटेल यांचं प्रश्नचिन्ह

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिकेच्या वैधतेबाबत अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. ३० जूनला अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार, तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची एकमतानं निवड झाली. त्यानुसार विधानसभेत अनिल पाटील, तर विधानपरिषदेत अमोल मितकरी यांची पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतल्या तरतुदींनुसार ही सर्व प्रक्रिया झाली, आणि त्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. पक्ष घटनेनुसार नियुक्त्या केवळ पक्षांतर्गत निवडणुकांच्या माध्यमातून होतात. संघटनात्मक चौकट डावलता येत नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. दिल्लीत काल झालेल्या बैठकीला कायद्याच्या दृष्टीनं महत्त्व नाही. कारण पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, असं त्यांनी सांगितलं.