राष्ट्रीय तपास यंत्रणेला केरळमध्ये इसिसच्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यात यश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दुसऱ्या एक कारवाईत राष्ट्रीय तपास यंत्रणेला केरळमध्ये इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यात यश आलं आहे. या कारवाईमुळे प्रार्थनास्थळांवर आणि काही समुदायाच्या नेत्यांवर होणारे संभाव्य दहशतवादी हल्ले टाळणे शक्य झाले आहे. एनआयए ने केरळ पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकातल्या गुप्तहेरांसह केलेल्या संयुक्त कारवाईत चार ठिकाणी शोधकार्य राबवत एका आरोपीला अटक केली आहे.