दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्याबाबत दुटप्पी भूमिका घेणं उचित नाही- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्याबाबत दुटप्पी भूमिका घेणं उचित नसल्याचं परखड मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. शांघाय सहकार्य संघटनेच्या आभासी माध्यमाद्वारे आयोजित परिषदेला त्यांनी संबोधित केलं. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांचा कठोर शब्दात निषेध करायला हवा, असं सांगून दहशतवादाविरोधात एकत्रित लढण्याचं आवाहन त्यांनी एससीओच्या सदस्य देशांना केलं. या परिषदेत एससीओच्या सदस्य देशांनी नवी दिल्ली कराराला मंजुरी दिली. दहशतवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद यांच्या विरोधात लढण्यासाठीची वचनबद्धता यात अधोरेखित करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांसाठीचा वित्तपुरवठा रोखणं, युवकांमधील कट्टरतावादाला आळा घालण्यावरही या करारात भर देण्यात आला आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image