26 जुलै रोजी साजरा होणाऱ्या कारगिल विजय दिन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोने स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर तासगाव येथे स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सांगली विभागाचे अधीक्षक प्राचार्य  मिलिंद हुजुरे  यांच्या हस्ते संपन्न झाले.

तीन दिवस चालणारे हे चित्र प्रदर्शन स्वामी रामानंद भारती विद्यामंदिरच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित माहिती तसेच दस्तऐवज पाहण्यासाठी एक दुर्मीळ संधी उपलब्ध करून देणार आहे.

स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर तासगाव येथे आगामी कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे #AzadiKaAmritMahotsav या विषयावरील दुर्मिळ फोटो प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न pic.twitter.com/REW8v3kWnc

— केंद्रीय संचार ब्यूरो, कोल्हापूर, महाराष्ट्र (@CBCKolhapur) July 24, 2023

26 जुलै रोजी होणाऱ्या  कारगिल विजय दिनी  शाळेमध्ये आयोजित कृतज्ञता सोहळ्याबरोबर  या प्रदर्शनाची सांगता होईल.