केंद्राकडून 19 राज्यांना 6194 कोटी रुपयांच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला मंजुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गृहमंत्री अमित शाह यांनी 19 राज्य सरकारांना 6194 कोटी रुपयांच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला मंजुरी दिली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमधल्या आपत्ती निवारणाच्या कामात या निधीमुळे राज्यांना मदत होईल. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तीन हजार सहाशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम या आर्थिक वर्षासाठी 9 राज्यांना मंजूर करण्यात आली आहे. 2021 पासून 2026 पर्यंत 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार 1 लाख 28 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी केंद्र सरकारकडून राज्य आपत्ती निवारण दलासाठी मंजूर करण्यात आला आहे.