INS 'वागीर' पाणबुडी आजपासून २२ तारखेपर्यंत श्रीलंकेला भेट देणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय नौदलाची अत्याधुनिक पाणबुडी, INS 'वागीर' आजपासून २२ तारखेपर्यंत श्रीलंकेला भेट देणार आहे. ही भेट ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्शभूमीवर आयोजित करण्यात आली आहे. 'ग्लोबल ओशन रिंग' या संकल्पनेनुसार भारतीय नौदलाच्या पाणबुडीचे कमांडिंग अधिकारी श्रीलंकेच्या पश्चिम नौदल क्षेत्राचे कमांडर, रिअर अॅडमिरल सुरेश डी सिल्वा यांची भेट घेणार आहेत. याशिवाय,पाहुणे आणि शालेय विद्यार्थी INS वागीरला भेट  देऊ शकतील, त्यामुळे त्यांना पाणबुडी प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळेल. या भेटीच्या अनुषंगानं भारतीय उच्चायुक्तालयानं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्यानं कोलंबो बंदरावर २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.भारत आणि श्रीलंकेचे वरिष्ठ संरक्षण अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image