२१ जूनला विधान भवनाच्या प्रांगणात 'योगप्रभात @ विधान भवन II' हा कार्यक्रम होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त येत्या बुधवारी, २१ जूनला विधान भवनाच्या प्रांगणात 'योगप्रभात @ विधान भवन II' हा कार्यक्रम होणार आहे.  सकाळी ७ ते ९ या वेळेत राज्य विधिमंडळ सदस्यांसह सुमारे दोन हजार योगप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जगातल्या सर्व देशांमध्ये या दिवशी सामूहिक योगासनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी योगाचं महत्व अधोरेखित केले जातं. याच पार्श्वभूमीवर यंदा विधान भवनात हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. नार्वेकर यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उप भापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपस्थित राहतील.