सरकारनं दुधाच्या भावात वाढ आणि दुधाचं धोरण ठरवावं अशी लक्ष्मण हाके यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गाईच्या दुधाला ४० आणि म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाववाढ मिळावी तसंच सरकारनं दुधाचं धोरण ठरवावं अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. ते आज सोलापूर इथं शासकीय विश्रामगृह इथं वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीच्या पूजेला येण्याआधी शेतकऱ्यांसाठीचा निर्णय घ्यावा अन्यथा पक्षाकडून विधान भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

लंम्पी रोग आणि कोरोना महामारी नंतर दुध व्यवसाय उभारी घेत असताना महाराष्ट्रातल्या दूध संघानी दुधाचे दर अचानक कमी केले. याचं उत्तर राज्य शासनानं आणि दूध संघानी शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे. दुधाला एफआरपी कायदा लागु करण्यात यावा तसंच शासनानं गुजरातच्या अमूल प्रमाणे दुधाचा एक ब्रॅन्ड निर्माण करून "ना नफा ना तोटा" या धरतीवर दुग्ध व्यवसाय वाढीचा धोरणात्मक निर्णय घ्यावा अशा मागण्या शिवसेनेच्यावतीनं यावेळी करण्यात आल्या. 

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image