तेंलगणाचे मुख्यमंत्री, के चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरात जाऊन घेतलं दर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आषाढी एकादशीनिमित्त, वारीसाठी जाणाऱ्या दिंड्या पंढपुरकडे मार्गक्रमण करत आहेत. राज्याच्या विविध भागातून तसंच तेलंगण, कर्नाटक, या शेजारी राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढपुरमध्ये येत असतात.

तेंलगणचे मुख्यमंत्री, के चंद्रशेखर राव यांनी आज पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे अनेक नेते आणि तेंलगणातल्या मंत्रीमंडळाचे काही सदस्य होते. के चंद्रशेखर राव यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात, गेले दोन दिवस अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. पंढरपुर जवळ सरकोली या गावी त्यांची जाहीर सभा झाली.