बँक ऑफ महाराष्ट्रला भारतीय रिझर्व्ह बँकेनं ठोठावला दंड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज आणि पतपुरवठाप्रक्रीयेत नियमांचा भंग केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रला, भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक कोटी ४५ लाख रुपये दंड ठोठावला आहे. एका कर्जवितरणात पुरेशी काळजी न घेतल्याबद्दल, तसंच  एटीएमशी संबंधित नियमांचं पालन न केल्याबद्दल ही कारवाई केल्याचं, रिझर्व बँकेच्या पत्रकात म्हटलं आहे. खातेदारांच्या उत्पन्नाचा ठोकताळा, मालमत्ता वर्गीकरण, आणि क्रेडीट कार्डाविषयीच्या दिशानिर्देशांचं पालन न केल्याबद्दल ॲक्सिस बँकेलाही रिझर्व्ह बँकेनं तीस लाख रुपये दंड ठोठावला आहे.