ठाणे बनावट नोटा प्रकरणी दोन बांग्लादेशींना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे बनावट नोटा प्रकरणात मुंबईतल्या एनआयए विशेष न्यायालयानं काल दोन बांग्लादेशींना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसंच आरोपींना भारतीय दंड संहिता कलम ४८९ (क) , ४८९(ब) आणि यूए(पी) अंतर्गत प्रत्येकी १० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. अब्दुल्ला शैखदार आणि नजमुल हसन हे आरोपी बांग्लादेश इथल्या खुलनाचे रहिवासी आहेत. या आरोपींनी ४ लाख ८ हजार किंमतीच्या बनावट नोटा बांग्लादेशातून महाराष्ट्रात आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी सेल आणि गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे प्रकरण २०१५ साली उघडकीला आलं. एनआयएनं आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर तीन वर्षानंतर या दोन आरोपींना दोषी ठरवण्यात आलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image