बूथ पातळीवर सेवा हेच कामाचं माध्यम - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असून, त्यांनी भोपाळ इथं भारतीय जनता पार्टीच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ‘मेरा, बूथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमाअंतर्गत भोपाळच्या मोतीलाल नेहरु स्टेडिअमवर झालेल्या कार्यक्रमात देशभरातल्या ५४३ लोकसभा मतदारसंघातून १० लाखापेक्षा अधिक कार्यकर्ते दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाले होते.

बूथ पातळीवर, सेवा हेच कामाचं माध्यम आहे. आणि भाजपाची सर्वात मोठी ताकद कार्यकर्ते हीच आहे, असं प्रधानमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं. तसंच गावांचा विकास झाला, तरच देशाचा विकास होईल, असं प्रधानमंत्री म्हणाले. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image