अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करुन प्रधानमंत्री इजिप्तला रवाना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इजिप्तला रवाना झाले. प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी चर्चा करतील. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री, इजिप्त सरकारमधील वरिष्ठ मान्यवर, काही प्रमुख इजिप्शियन व्यक्ती तसंच इजिप्तमधील भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्र्यांच्या इजिप्त दौऱ्यादरम्यान अनेक धोरणात्मक भागीदारी दस्तऐवज आणि सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.