राष्ट्रीय साठ्यातून गरजेनुसार तूरडाळ बाजारात आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : तूरडाळीचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी आयात केलेली डाळ येईपर्यंत राष्ट्रीय साठ्यातून गरजेनुसार तूरडाळ बाजारात आणण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. त्यादृष्टीनं, डाळ तयार करणाऱ्या पात्र कंपन्यांकडून ऑनलाईन लिलावाद्वारे डाळ घेण्याचे निर्देश केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ तसंच राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला दिले आहेत. या महिन्यातच साठेबाजीला आळा घालण्याच्या दृष्टीनं केंद्रानं तूर आणि उडदाच्या साठ्यावर मर्यादा घातली होती. ही मर्यादा ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे.
 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image