कट्टर शिवसैनिक आपल्यासोबतच असल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले कट्टर शिवसैनिक आपल्याबरोबर असून गद्दारांपेक्षा निष्ठावंताचं नेतृत्व करण्यात अधिक आनंद आहे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पक्षाच्या राज्यव्यापी पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपा आणि मोदी शहा यांच्यावरही टिका केली. मोदींनी मणिपूर शांत करुन दाखवावं. भांडणं लाऊन निवडणुका जिंकता येत नाहीत असं ते म्हणाले. मी पाटण्याला जात आहे असं सांगताना त्यांनी देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण एकत्र येत आहोत.

देशावर प्रेम करणाऱ्यांनी आमच्या सोबत यावं, असं ते म्हणाले. जनतेचे डोळे आता उघडत असून मुंबई कोणीही तोडू शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी बोलतांना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी शाक्षणिक, वैद्यकीय, परिवहन, या क्षेत्रात मुंबई महानगर पालिकेनंं केलेल्या कामांची प्रशंसा केली.  मुंबईत जे चांगले करु शकलो ते महाराष्ट्रात करायचे असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.