न्यायालयीन कोठडीत कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या राज्यांना सूचना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायालयीन कोठडीत कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं, केंद्र सरकार, सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना, मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. न्यायालयीन कोठडीत कैद्यांकडून जाणुनबुजून आत्महानी होते, ती कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बहुसंख्य कैद्यांचे मृत्यू आत्महत्यांमुळे होतात, असं निरीक्षण आयोगानं नोंदवलं आहे. या पार्श्वभूमीवर, या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, कारागृहातल्या कैद्यांना त्यांच्या नातलगांशी संवाद साधण्यासाठी कॉईन बॉक्सऐवजी, स्मार्टकार्ड फोन सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात या सेवेचा प्रारंभ, अपर तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाला. येरवडा कारागृहातल्या या सुविधेचा आढावा घेऊन, राज्यातल्या इतर कारागृहात या सुविधेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती, गुप्ता यांनी यावेळी दिली.