मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोरोना घोटाळ्याप्रकरणी ईडीचे मुंबईसह काही शहरांमध्ये छापे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोरोना घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबईसह काही शहरांमध्ये छापे टाकले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे  सुजित पाटकर यांच्याशी संबंधित तब्बल १० ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबईतल्या तब्बल १५ हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. मुंबई महानगर पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल तसंच  शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या घरीही ईडीची छापेमारी सुरू आहे.. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात.