महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. ते काल सह्याद्री राज्य अतिथीगृहात यासंदर्भात आयोजित बैठकात बोलत होते. सध्याही विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात मात्र आता भविष्यात त्यामध्ये अधिक समन्वयाची आवश्यकता भासणार आहे.त्यादृष्टीनं सध्या 'आयआय'टी मुंबईत या मिशनची सुरूवात करावी, नंतर यामध्ये अधिक सुसूत्रता आणावी, असं त्यांनी सांगितलं.

शेती क्षेत्रासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल. प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे, तसंच यासंदर्भात प्रमाण कार्यपद्धत तयार करण्याचे निर्देशही फडनवीस यांनी यावेळी दिले. 'आयआयटी मुंबई'चे अधिष्ठाता मिलिंद अत्रे यांनी सादरीकरण केलं. जागतिक दर्जाचं ड्रोन हब तयार करणं, मुख्यालयाची स्थापन, त्याचं विकेंद्रीकरण, या सर्व यंत्रणा उभारण्यासाठी पायाभूत सुविधा, ड्रोन पोर्ट, कुशल मनुष्यबळ, तसंच एकात्मिक यंत्रणा उभारणं, ही कामं याअंतर्गत केली जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image