प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचण्याचा, असमानता दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून, प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचत, असमानता दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील गांधीनगर इथं केलं. गांधीनगरमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते.

अनेक दशकांपासून विविध निवास योजना असूनही, अदयाप 75 टक्के लोकसंख्येसाठी योग्य शौचालयांची उपलब्धता नाही. घर हे केवळ निवारा नसून ते विश्वासाचे ठिकाण आहे, जिथं स्वप्ने साकार होतात आणि नव्या शक्यतांचा जन्म होतो, असंही प्रधानमंत्री म्हणाले. आपलं सरकार लाभ देताना धर्म किंवा जात पाहत नाही आणि हीच खरी धर्मनिरपेक्षता आहे. सरकारनं गरिबीविरुद्धच्या लढाईसाठी मजबूत आधार देणारी घरं निर्माण केली आहेत, ते सशक्तीकरण आणि सन्मानाचं साधन आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image