महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे राज्यात रस्त्यांची कामं दर्जेदार आणि वेगानं होणार आहेत. घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प राबवण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. त्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य दिलं जाईल. सर्व शहरांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. 

करमणूक शुल्क आकारणीत सूट देण्याचा, तसंच कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं यावेळी घेतला.  

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image