आरे ते वांद्रे कुर्ला संकुलादरम्यान वर्षाअखेरपर्यंत मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचं आहे. त्यानुसार येत्या डिसेंबरपर्यंत मेट्रो-३ चा आरे ते बीकेसी स्थानक दरम्यानचा टप्पा पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. चर्चगेट ते विधानभवन या भुयारी मार्गाची काल रात्री उशिरा पाहणी केल्यानंतर बोलत होते. दुसरा टप्पा पुढच्या वर्षीच्या जून पूर्वी पूर्ण केला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कुलाबा-वांद्रे- सिप्झ दरम्यानचा मुंबई मेट्रो मार्ग-३ हा मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. मेट्रो ३ मार्ग हा मेट्रो -१, २,६ आणि ९ यांना तसेच मोनोरेलला जोडला जाणार आहे. याशिवाय, उपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विमानतळालाही जोडला जाणार आहे.