कर्नाटक विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी

 
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या २२४ जागांसाठीची मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होत आहे. यासाठी राज्यभरात ३४ मतमोजणी केंद्र्ं उभारण्यात आली आहेत. कर्नाटक विधानसभेसाठी परवा झालेल्या मतदानात ७३ पूर्णांक १९ शतांश टक्के मतदान झालं होतं. उद्या सर्वसाधारण मतमोजणी प्रक्रियेनुसार मतमोजणी होईल. मतदान यंत्र आणि मतमोजणी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत होईल.