राज्य सरकार, राज्यातल्या २ लाख तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार, राज्यातल्या २ लाख तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार असून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन आता आपल्या दारी आलं आहे, असं आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी म्हटलं आहे. नंदुरबारमध्ये आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरात आज त्यांनी  युवकांना मार्गदर्शन केलं, त्यावेळी ते बोलत होते. नोकरी न मिळालेल्यानी नाराज न होता शासनाच्या समुपदेशन मेळाव्यात मार्गदर्शन घ्यावं आणि रोजगाराच्या इतर संधींचा उपयोग करावा, असं आवाहन त्यांनी केलं. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून १०० टक्के रोजगार देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत, असं गावित यांनी सांगितलं.