भाजपा धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याची नाना पटोले यांची टीका

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाली असून पराभव दिसत असल्यानं ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत, अशा टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. 

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. भाजपाकडे जनतेला सांगण्यासारखे काही नाही म्हणून ते नेहमीप्रमाणे धर्माच्या नावावर फुट पाडून मतं मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असं ते म्हणाले.