राज्यात दंगल करवणाऱ्यांना अद्दल घडवली जाईल असा उपमुख्यमंत्र्यांचं इशारा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कुणालाही दंगल घडवू देणार नाही आणि जे असा प्रयत्न करताहेत, त्यांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिला.पुण्यात ते बातमीदारांशी बोलत होते. अकोला आणि नगर दोन्ही ठिकाणी शांतता आहे. दोन्ही ठिकाणी पोलीस सावध होते. जिथे गरज होती, तिथे अतिरिक्त पोलिस कुमक पाठविली होती. आता संपूर्ण स्थिती शांततापूर्ण आहे, अशी माहिती फडनवीस यांनी दिली.

कुणीतरी जाणूनबुजून राज्यातलं शांततेचे वातावरण आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करतं आहे. असा प्रयत्न करणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही. काही संस्था, व्यक्ती हा प्रयत्न करता आहेत, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आम्ही विधानसभा अध्यक्षांना चालू देणार नाही, फिरु देणार नाही, घेराव करु, अशी भाषा ठाकरे गटाकडून वापरली जात असल्याबद्दल बातमीदारांनी फडनवीस यांनी विचारलं असता, ठाकरे गटाची बाजू कमकुवत असल्यानेच अशी भाषा त्यांच्याकडून वापरली जात असल्याचं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्ष हे स्वत: एक वकील आहेत. ते कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. ‘वाजवी वेळेत’ निर्णय घ्यायचा अर्थ त्यांना कळतो आणि मला खात्री आहे की, कोणत्याही दबावाला बळी न पडता, ते कायदा-संविधानावर आधारित निर्णय घेतील.