एसटी महामंडळाचं जादा वाहतूक अभियान’सुरू होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात १ मे पासून १५ जून पर्यंत उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळानं जादा वाहतूक अभियान’सुरू केलं आहे. या अभियानाच्या दहा दिवसांतच महामंडळाच्या धुळे विभागाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही ११ टक्क्यांनी जास्त किलोमीटर बस चालवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. धुळे विभागाला प्रती दिवस २ लाख ४५ हजार किलोमीटर पर्यंत बस चालवण्याचे उद्धिष्टं होतं. त्यापेक्षा ११ हजार किलोमीटर अधिक बस धावल्या आहेत. या दिवसांत सवलत मूल्यासह १५ कोटींचं भरघोस उत्पन्न धुळे विभागाला मिळालं असल्याची माहिती धुळे विभागीय नियंत्रक विजय गिते यांनी दिली आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image