भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस दिल्ली युद्धनौका आसियान भारत सागरी सरावात सहभागी

 नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूरमध्ये आज पासून सुरु होणाऱ्या आसियान भारत सागरी सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस दिल्ली या युद्धनौका दाखल झाल्या आहेत. सात दिवसांच्या या सराव सत्रामुळे भारतीय नौदल आणि आसियान नौदलांना एकत्र काम करण्याची संधी मिळेल, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या या युद्धनौका सिंगापूरमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आणि आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा परिषदेतही सहभागी होणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं.