प्रचारादरम्यान संयम बाळगण्याची आणि आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याची निवडणूक आयोगाची सर्व पक्षांना सूचना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनी आणि पक्षांचा प्रचार करणाऱ्यांनी प्रचारादरम्यान जाहीरपणे बोलताना संयम बाळगावा आणि निवडणुकीचं वातावरण बिघडू नये याची काळजी घ्यावी, असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.निवडणूक आयोगानं एक मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे.त्यात ही सूचना करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं ही नियमावली जारी केली आहे. या नियमावलीचं पालन करण्याचा आणि नियामक चौकटीनुसार योग्य ती कारवाई करण्याचा आदेशही निवडणूक आयोगानं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे.